
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा -गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात केलेले काम हा ट्रेलर आहे. तिसर्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आणखीन पिक्चर स्पष्ट होईल. देश महासत्ता बनेल. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास ही संकल्पना खर्या अर्थाने सत्यात उतरविण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन झााले पाहिजे. यासाठी देशातून ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत आणि म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांना प्रचंड मताने निवडून देवू या, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी केले. रत्नागिरी येथे जाहीर सभेला ते संबोधित करताना बोलत होते. www.konkantoday.com