
इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये संकासूर लघुपट सर्वोत्तम
शितल राजे फाऊंडेशन चिपळूण, कोकण फिल्म आणि टेलिव्हिजन इंस्टिट्यूटच्यावतीने जागतिक लघुपट महोत्सव घेण्यात आला. ५० लघुपट या महोत्सवात सहभागी झाले. अजिंक्य जाधव आणि किशोर नाईक यांच्या संकासुर या लघुपटाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. विनोद गोंदकर यांच्या लॉकडाऊन पॉझिटीव्ह याने दुसरा, आबा पेडणेकर यांच्या आरोग्य सेतू या लघुपटाने तृतीय क्रमांक, तसेच सत्यवान गागरे यांच्या लॉकडाऊन शेती या लघुपटाला विभागून तिसरा क्रमांक देण्यात आला. याबरोबरच अन्य पारितोषिकेही देण्यात आली.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम क्रमांक मितेश टाके यांना दुर्गाज लॉकडाऊन या लघुपटासाठी मिळाला. तर दुसरा क्रमांक गणेश शिंदे यांना सेल्फी या लघुपटासाठी, तिसरा क्रमांक अलेक्झांडर मानी यांना रिकॉल या लघुपटासाठी मिळाला. या महोत्सवासाठी सत्येंद्र राजे, सौ. शितल राजे, कु. सलोनी राजे, कु. ऋचा गायकवाड, डॉ. सुरेश सुतार, अपर्णा सिसीदीया यांनी मेहनत घेतली.
konkantoday.com