
मान्सूनपूर्व पावसाचा फटका, चिपळुणात गळक्या छप्परामुळे यांत्रिकी विभागात पाणीच पाणी.
चिपळूण तालुक्यात सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसाचा फटका चिपळूण आगाराला बसला असून गळक्या छप्परांमुळे यांत्रिकी विभागात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. याशिवाय इतर साहित्यही या पावसात पूर्णतः भिजल्याने कर्मचार्यांना एसटी दुरूस्ती करणे अवघड होवून बसले आहे. तत्काळ गळके छप्पर दुरूस्त करण्याच्या मागणीला जोर होवू लागला आहे.काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला आहे. तालुक्यात सर्वत्र कोसळत असलेल्या धुवॉंधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचत असल्याचे चित्र आहे.
असे असताना मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका चिपळूण आगाराला बसला. विस्तारित असलेल्या बसस्थानकात स्वतंत्र यांत्रिकी कार्यशाळा विभाग आहे. त्यात स्थानिक आगारासह इतरत्र ठिकाणी नादुरूस्त बसेच दुरूस्त केल्या जातात. असे असताना या विभागाच्या गळक्या छप्परमधून पावसाचे पाणी आत आल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले.www.konkantoday.com




