मत्स्य विभागाकडून रत्नागिरीत तीन एलईडी नौकांवर कारवाई
एलईडी दिव्याच्या प्रकाशझोतात मासेमारी करणार्या तीन नौका तटरक्षक दलाने पकडून मत्स्य व्यवसाय विभागाकडे सुपूर्द केल्या आहेत. याबाबतची पुढील कारवाई मत्स्यविभागाकडून सुरू झाली आहे.मासेमारी करणार्या तीन नौकांपैकी दोन नौकांमध्ये एलईडी प्रकाशझोताचे साहित्य होते. काही नौकांकडे योग्य कागदपत्रे नव्हती. दोन नौकांकडे सारख्याच प्रकारची कागदपत्रे होती. कागदपत्रांची छाननी करण्याचे काम मत्स्य विभाग व्यवसायाने पूर्ण करून उचित कारवाई कारवी, अशी शिफारस करण्यात आली. गुरूवारी नौका कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आल्या.तटरक्षक दलाने सांगितले की, केल्या कारवाईचा पतशील जाहीर करण्याची कार्यवाही आमच्याकडे करण्यात येत नाही. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त अभय शिंदे इनामदार म्हणाले की, ही प्रकरणे माझ्याकडे अद्याप कारवाईसाठी सादर झालेली नाहीत. अंमलबजावणी विभाग अशा संदर्भात योग्य ती पूर्तता करून प्रकरणे सादर करत असतो.www.konkantoday.com