बॅ. ए. आर. अंतुले यांचे जावई आणि काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
*. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅ. ए. आर. अंतुले यांचे जावई आणि काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.सोमवारी पक्षप्रवेश होणार असल्याचेही ते म्हणाले. ऐन लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले मुश्ताक अंतुले हे सुनील तटकरे यांचे जवळचे मित्र आहेत. मुश्ताक अंतुले हे काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जाता. गेल्या कित्येक वर्षांपासून ते काँग्रेसचे काम करत आहेत. बॅ. ए. आर. अंतुले यांचे ते उत्तराधिकारी म्हणून समजले जातात. इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर या आघाडीत काही काळ ते सक्रिय होते.मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी विरोधकांच्या तंबूत जात असल्याचे जाहीर केल्याने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.www.konkantoday.com