निवडणूक आयोगाकडून सर्वत्र व्हीव्हीपॅटसह ५० टक्के केंद्रांचे वेब कास्टींग
अनेकदा विविध राजकीय पक्षाकडून मतदान प्रक्रियेबाबत आक्षेप घेतले जातात. यंत्रणेबरोबरच यंत्रांबाबतही संशय व्यक्त केला जातो. काही मंडळींकडून गैरसमजही पसरवले जातात. याला पर्याय म्हणून निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता जपण्यासाठी व आक्षेप कमी करण्यासाठी विविध निर्णय घेत असतो. याचाच एक भाग म्हणून यावर्षी होवू घाातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वेब कास्टींगच्या मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यासह निवडणूक कर्मचारी वाहतुकीसाठी वापरात आणण्ययाच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा प्रस्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्याचे कामही संबंधित विभागाकडून सुरू करण्यात आले आहे.गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदानाच्या दिवशी संवेदनशील व धोकादायक मतदान केंद्रांच्या ठिकाणी वेब कास्टींग करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने अंमलात आणला. मात्र निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता जपण्यासाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी संवेदनशील व धोकादायक केंद्रे अथवा ५० टक्के यापैकी अधिक संख्या असलेल्या ठिकाणी वेब कास्टींग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार रत्नागिरी मतदार संघातील ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टींग केले जाणार आहे. यामुळे ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कॅमेरे लावले जाणार असून ते आंतरजालद्वारे निवडणूक नियंत्रण कक्षासह आयोगाच्या सुचनेनुसार अन्यत्रही जोडले जाणार आहेत. यामुळे गोपनीयता सांभाळून तेथील मतदान प्रक्रियेवर कॅमेराचा व त्याद्वारे यंत्रणेचाही वॉच राहणार आहे. www.konkantoday.com