नऊ उमेदवारांचे सर्वच्या सर्व अर्ज वैध
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी ९ उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले आहेत. आज त्यांची छाननी झाली असून, सर्वच्या सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. एका उमेदवाराच्या अर्जामध्ये काही त्रुटी होती. ती सुधारण्यासाठी दुपारी १ पर्यंतची मुदत दिली होती. त्या मुदतीत कागदपत्र सादर केल्याने तोही अर्ज वैध ठरला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. सोमवारी (ता. २२) अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. www.konkantoday.com