जिल्ह्यात गेल्या वर्षी हृदयविकाराच्या आजाराने सर्वाधिक २ हजार ४३० जणांचा मृत्यू

* जिल्ह्यात गेल्या वर्षी २०२२-२३ मध्ये विविध कारणांमुळे १० हजार ८०५ रुग्णांचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयांमध्ये साथीच्या आजारांतील हिवताप, विषमज्वर किंवा टायफाईड, गॅस्ट्रो, अतिसार, डेंगी, स्वाईनफ्ल्यूने गेल्या वर्षी एकही मृत्यू झाला नाही; परंतु हृदयविकाराच्या आजाराने सर्वाधिक २ हजार ४३० जणांचा मृत्यू झाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शासन साहाय्यित किंवा सार्वजनिक वैद्यकीय सुविधांतर्गत ५ दवाखाने, ६५ प्रसूतीगृह, ६७ प्राथमिक आरोग्यकेंद्रे आणि ३७८ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. या रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या आजारांमुळे मृत्यू झाले असले तरी जिल्हा आरोग्य विभागाकडील माहितीनुसार, साथीच्या आजारांतील हिवताप, विषमज्वर किंवा टायफाईड, डेंगी, स्वाईनफ्ल्यूने एकही मृत्यू झालेला नाही. शासकीय रुग्णालयांमध्ये वेळेत उपचार केले गेल्याने या आजाराने मृत्यू झालेला नाही. साथीच्या आजारातील क्षयरोगाने ९३ तर श्वसनक्रियेसंबंधित आजाराने ३२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बिगरसाथीच्या आजारामध्ये हृदयविकार येतो. या हृदयविकाराने सर्वाधिक २ हजार ४३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कमी वयातही या विकाराने मृत्यू झाले आहेत. कर्करोगाने २९४ तर एड्सने २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. बाळंतपणात ६ मातांचा मृत्यू झाला आहे. पक्षघाताने ५६७, मूत्रपिंडाच्या आजाराने १ हजार २७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या प्रकारातील मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. यामध्ये ११५ आत्महत्या असून, रहदारी वाहतुकीने १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. इतर अपघातांमध्ये १८ मृत्यू झाले आहेत. इतर अनेक कारणांनी मृत्यू होतात. हे मृतदेह शासकीय रुग्णालयांमध्ये आणले जातात. अशा मृत्यूंचे प्रमाणही मोठेआहे. ५ हजार ४६० मृत्यू अशा इतर कारणांमुळे झाल्याची नोंद आहे.www.konkantody.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button