
हरचेरी धरणातील पाणी संपत आले, एमआयडीसीची पाणी कपात पाऊस न पडल्यास परिस्थिती बिकट
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरासह ९ ग्रामपंचायती, मिरजोळे, उद्यमनगर औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणार्या एमआयडीसीच्या हरचेरी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे एमआयडीसीने एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असून १० जूनपर्यंत पाऊस न पडल्यास गेल्या अनेक वर्षात प्रथमच एमआयडीसीचा पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प होणार आहे. त्याचा फटका ग्रामस्थ नागरिकांना बसणार आहे.
एमआयडीसीच्या हरचेरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. सुमारे २९७ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा करण्याची क्षमता धरणाची आहे. परंतु गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने आवश्यक तेवढा पाणीसाठा झाला नाही.