कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या गीतातील भवानी शब्द काढणार नाही-उद्धव ठाकरे
* शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मशाल गीतातील ‘जय भवानी’ शब्द काढण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या गीतातील भवानी शब्द काढणार नाही. जय भवानी, जय शिवाजी, ही आमची घोषणा आहे. घोषणेतील जय भवानी शब्द तुम्ही काढायला लावताय, उद्या तुम्ही जय शिवाजी काढायला लावाल, अशी हुकूमशाही पद्धत आम्ही स्वीकारणार नाही. आम्ही याच्या विरोधाच लढत आहोत, लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत आमच्या गीतातून जय भवानी शब्द काढला जाणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.निवडणूक आयोगाने जर आमच्यावर कारवाई करण्याचं ठरवलं तर आधी मोदी आणि शाहांवर कारवाई करावी लागेल, मग ते आमच्या महाराष्ट्राच्या दैवतेचा अपमान कसं करतात, ते पाहू, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिलं आहे.मध्य प्रदेश निवडणुकीच्या वेळेस बजरंग बली यांच्या नावावर मत द्या, असं वक्तव्य मोदी यांनी केलं होत. याशिवाय, आम्हाला मत दिल्यास रामल्लाचं मोफत दर्शन देऊ, असं अमित शाह जाहीर सभेत बोलले होते. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मोदी आणि शाहांचे ते व्हिडीओ दाखवले. मोदी आणि शाहांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितल्याचं ठाकरेंनी सांगितलं आहेwww.konkantoday.com