केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रत्नागिरीतील सभा रद्द.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती उमेदवाराच्या प्रचारार्थ दिनांक 24 एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे.शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर ही जाहीर सभा 24 एप्रिल 2024 रोजी होणार होती. काही अपरिहार्य कारणास्तव ही सभा लांबणीवर टाकण्यात आली असल्याचे पत्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रत्नागिरी यांना रविवारी दिले आहे. शहा यांची सभा रद्द होण्याचे कारण कळू शकलेले नाही शहा यांच्या सभेसाठी रत्नागिरीतील गोगटे कॉलेज मैदानावर भव्य मंडपाचे काम सुरू करण्यात आले होतेwww.konkantoday.com