
कडकनाथचे सेवन करा आणि ही शक्ती मिळवा , कडकनाथ रिसर्च सेंटरचा दावा
कडकनाथ कोंबडी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते या कोंबडी बद्दल अनेक दावे प्रतिदावे केले गेले त्यामुळे अनेकांनी या व्यवसायाकडे धाव घेतली मात्र त्यामध्ये बऱ्याच जणांची फसवणूक झाल्याने त्याला नुकसानीलाही तोंड द्यावे लागले होते कडकनाथचे फॅड सुरवातीला आल्यानंतर या कोंबडीच्या मांसाच्या सेवनाने अनेक रोगांवर फायदा मिळतो असा दावा करण्यात आला होता आता करोनाची लागण आणि त्यानंतर बरे झाल्यानंतर आहारात कडकनाथ कोंबडीचा वापर केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते, असा दावा मध्य प्रदेशातील झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषि विज्ञान केंद्राने केला आहे. यासाठी इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्चला एक पत्र पाठवण्यात आलं आहे. यात कडकनाथ कोंबड्यांच्या मांसातून प्रोटीन, विटामिन, झिंक आणि लो फॅट मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कोलेस्ट्रॉल फ्री असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे करोना झाल्यानंतर आणि त्यातून बरे झाल्यानंतर आहारात कडकनाथ कोंबडीचा वापर करायला हवं असं सांगण्यात आलं आहे.
www.konkantoday.com
