आंब्याची आवक वाढल्याने मुंबई बाजारात हापूसची दर घसरण
गतवर्षीपेक्षा यावर्षी हापूस आंब्याची आवक वाशी-मुंबई फळबाजारात मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे दर घसरण झाली आहे. सध्या २०० ते ७०० रुपये डझन या दराने विक्री सुरू आहे. गतवर्षी दरदिवशी २२ हजार पेट्या वाशी बाजारात येत होत्या. यावर्षी त्याच तारखांना आवक ६० ते ६४ हजार पेट्यांवर पोहोचली आहे. हेच प्रमाण एप्रिल अखेरपर्यंत कायम राहिल, असा अंदाज फळबाजारातील ख्यातनाम आणि माजी संचालक व्यापारी संजय पानसरे यांनी व्यक्त केला.ते म्हणाले, वाशी येथील फळबाजारात सध्या हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. गतवर्षीपेक्षा अनेक पटीने आंबा येत आहे. एप्रिल अखेरपर्यंत हे चालू राहिल. ४-५ मे च्या सुमारास देवगड हापूसचा यावर्षीचा हंगाम संपेल. त्यानंतर रत्नागिरी व रायगड येथील आंबा वाशी बाजारात सुरू राहील. www.konkantoday.com