
मंडणगडात रास्त भाव दुकानात ४७ इ पॉस मशिनचे वाटप
मंडणगड तालुक्यातील ४७ रास्त भाव धान्य दुकानांना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या नवीन इ पॉस मशिन्समध्ये वितरण शुक्रवारी तहसीलदार श्रीधर गालीपेल्ली यांच्याहस्ते करण्यात आले. यानिमित्त इ पॉस मशिनचा शुभारंभ करण्यात आला. रास्तभाव धान्य दुकानदारांना तांत्रिक सहाय्यक थिकटे व उपानेकर यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी महसूल नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, पुरवठा निरीक्षक मयूर पोळ, रास्त दुकानदार संघटना मंडणगड तालुकाध्यक्ष प्रदीप मालुसरे, प्रताप घोसाळकर आदी उपस्थित होते. नवीन मशिन आल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करताना येणार्या तांत्रिक अडचणी कमी होणार आहेत. www.konkantoday.com