
.तर आ. भास्कर जाधव याद राखा आमच्या वाटेला गेलात तर तुमच्या बैठकीत येवून तमाशा करू, मनसे नेते अविनाश जाधवांचा इशारा
. आमदार भास्करशेठ जाधव शिल्लक सेनेचे नेते आहेत. तुम्ही आमच्या नेत्याच्या वाटेला जावू नका, राजसाहेब तुमच्या नेत्यांना काहीही बोलत नाहीत. तुम्ही विनाकारण आमच्या राजसाहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलात तर मनसेचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. याद रराखा आमच्या वाटेला गेलात, तर तुमच्या भर बैठकांमध्ये येवून तमाशा करू, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते भास्करशेठ जाधव यांना दिला आहे. त्यामुळे उबाठाविरूद्ध मनसे संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीला आलेल्या अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत आमदार भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो पक्ष स्थापन केला, मोठा केला, नावारूपाला आणला, सत्ता मिळवली, त्याच बाळासाहेबांचा मुलगा धोंडा निघाला आहे. शिवसेनेतले आमदार एकेक करून सोडून जात आहेत. असे असताना शिल्लक सेनेचे आमदार भास्करशेठ जाधव हे विनाकारण राजसाहेबांना टार्गेट करीत आहेत. मनसैनिक पेटून उठला, तर आ. भास्कर जाधव यांना फिरणे कठीण होईल, असे श्री. जाधव यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला दिला आहे.www.konkantoday.com