
जनशताब्दीच्या ब्रेक लायनरमधून अचानक आला धूर आल्याने प्रवशांत घबराट
कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईवरून मडगावच्या दिशेने जाणार्या जनशताब्दी एक्सप्रेसचे अचानक ब्रेक दाबल्याने धूर आल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजण्यच्या सुमारास आंजणी रेल्वे स्थानकादरम्यान घडली. यामुळे एक्सप्रेस २५ मिनिटे थांबवून नंतर मार्गस्थ झाल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले.१२०५१ क्रमांकाची मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणार्या जनशताब्दी एक्सप्रेसमधून अचानक धूर आल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. ही बाब एक्सप्रेसच्या लोकोपायलटच्या निदर्शनास येताच तातडीने आंजणी स्थानकात थांबा देण्यात आला. अखेर बिघाड दूर झाल्यानंतर एक्सप्रेस माणगावच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यानंतर रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. www.konkantoday.com