62.37 टक्के मतदान; पहिल्या टप्प्यात 2019 पेक्षा 7 टक्के कमी मतांची घसरण! त्रिपुरात सर्वाधिक!!

नवी दिल्ली : उष्णतेची लाट असूनही शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६२.३७ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांमध्ये सरासरी ५७.८२ टक्के मतदानाची नोंद झाली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ७० टक्के मतदान झाले होते. त्यातुलनेत यावेळी ७ टक्के कमी मतदान झाले.पश्चिम बंगाल व मणिपूरमध्ये काही ठिकाणे वगळता १९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान झाले. लोकसभेसह सिक्कीम आणि अरुणाचल राज्यांच्या विधानसभेसाठी मोठया प्रमाणवर मतदान झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या शुक्रवारी रात्री ९ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार त्रिपुरामध्ये सर्वाधिक ८०.१७ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये ७७.५७ टक्के तर, मणिपूरमध्ये ६९.१३ टक्के मतदान झाले. बिहारमध्ये सर्वात कमी ४८.५० टक्के मतदान झाले. *० मतदानाचा टक्का (आकडेवारी रात्री ९ वाजेपर्यंत)*अंदमान-निकोबार- ५६.८७अरुणाचल प्रदेश- ६७.१५आसाम- ७२.१०बिहार-४८.५०छत्तीसगढ-६३.४१जम्मू-काश्मीर- ६५.०८लक्षद्वीप-५९.०२मध्य प्रदेश-६४.७७महाराष्ट्र- ५५.३५मणिपूर-६९.१३मेघालय- ७४.२१मिझोराम-५४.२३नागालँड-५६.९१पुडुचेरी-७३.५०राजस्थान-५६.५८सिक्कीम-६९.४७तामीळनाडू-६५.१९त्रिपुरा-८०.१७उत्तर प्रदेश-५८.४९उत्तराखंड-५४.०६पश्चिम बंगाल-७७.५७*www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button