हातदे तील धामापूरकर कुटुंबियांच्या घराला जाणीवपूर्वक आग लावल्याचा आरोप
राजापूर तालुक्यातील हातदे येथील चर्मचार समाजातील धामापूरकर कुटुंबियांचे राहते घर वणव्यात जळून खाक झाल्याची दुर्घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. मात्र ही आग अज्ञात समाजकंटकांनी जाणीवपूर्वक लावल्याचा आरोप राजापूर तालुका चर्मकार समाज सेवा संघाच्या वतीने करण्यात आला आहे. गाव रहाटीत मागासवर्गीयांचा सहभाग झाल्यास देवाचा प्रकोप होतो, असे चित्र उभे करून चर्मकार समाजामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य समाजकंटकांनी केले असल्याचा आरोप करीत त्या नराधमांचा शोध घेवून कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन संघाच्यावतीने राजापूर पोलिसांना देण्यात आले आहे. www.konkantoday.com