स्वत:ची कार नाही, पाहा किती आहे गृहमंत्री अमित शाह यांची संपत्ती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी भाजपच्या पारंपारिक मतदारसंघ असलेल्या गांधीनगरमधून उमेदवारी दाखल केली आहे. गांधीनगर मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. लालकृष्ण अडवाणी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रतिनिधित्व केलेल्या जागेचं प्रतिनिधित्व करणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं जनतेसाठी खूप काम केलंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर दिली.अमित शाह यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हापासूनच त्यांचं प्रतिज्ञापत्र चर्चेत आहे. आपल्याकडे स्वतःची गाडी नाही आणि व्यवसाय म्हणून ते शेती करतात आणि सामाजिक कार्यकर्तेही असल्याचं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय. त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये खासदाराचा पगार, घर-जमीन भाड्याचं उत्पन्न, शेतीचं उत्पन्न आणि डिविडंड मिळकत यांचा समावेश होतो. यासोबतच त्याच्यावर ३ गुन्हे दाखल असल्याचीही नोंद असल्याचं त्यात नमूद करण्यात आलंय. *काय काय सांगितलंय प्रतिज्ञापत्रात?*१. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे अजूनही स्वतःची कार नाही २. त्यांच्याकडे ₹ २० कोटींची जंगम मालमत्ता तर ₹ १६ कोटींची स्थावर मालमत्ता आहे.२. अमित शाह यांच्यावर अजूनही ₹ १५.७७ लाखांचं कर्ज आहे. 4. त्यांच्याकडे फक्त २४,१६४ रुपये रोख आहेत. 5. अमित शाह यांच्याकडे ₹७२ लाख किमतीचे दागिने आहेत, त्यापैकी केवळ ₹ ८.७६ लाख त्यांनी खरेदी केले आहेत. ६. त्यांच्या पत्नीकडे १.१० कोटी रुपयांचे दागिने आहेत, ज्यात १६२० ग्रॅम सोनं आणि ६३ कॅरेट हिरे आहेत. ७. २०२२-२३ मध्ये अमित शाह यांचं वार्षिक उत्पन्न ₹७५.०९ लाख होतं.८. त्यांच्या पत्नीचं वार्षिक उत्पन्न ₹३९.५४ लाख आहे. ९. अमित शाह यांनी त्यांचा व्यवसाय शेती आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून घोषित केला आहे. त्यांच्या विरोधात ३ गुन्हे दाखल आहेत. १०. त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये खासदाराचा पगार, घर-जमीन भाड्यानं मिळणारं उत्पन्न, शेतीचं उत्पन्न आणि शेअर डिविडंडचं उत्पन्न यांचा समावेश होतो. ११. त्यांच्या पत्नीकडे ₹२२.४६ कोटींची जंगम मालमत्ता, ₹९ कोटींची स्थावर मालमत्ता असून त्यांच्यावरही २६.३२ लाख रुपयांचं कर्ज देखील आहे.www.konkantoday.com