रामपूरमध्ये पथनाट्यातून मतदान जनजागृती
चिपळूण तालुक्यातील रामपूर प्रभागातील जिल्हा परिषद मराठी शाळांच्या शिक्षकांनी पथनाट्यातून मतदान जनजागृती करून मतदारांचे लक्ष वेधून घेतले. मार्गताम्हाणे बाजारपेठ, चिवेलीफाटा येथे हा कार्यक्रम शिक्षकांनी सादर केला. या वेळी शिक्षक राष्ट्रपाल सावंत यांनी मतदान जनजागृतीपर गीत सादर केले. त्यांना इतर शिक्षकांनी दाद दिली. यानंतर शिक्षिका प्रांजली चव्हाण यांनी पथनाट्यातून मतदानाचे महत्व सांगून देशाप्रती असलेली देशभक्ती व लोकशाहीबद्दलची भावना व्यक्त केली.
www.konkantoday.com