राज्यात आंबा हंगामाची चांगली सुरूवात, ५ हजार टन आंबा निर्यातीचे पणन मंडळाचे लक्ष्य
यावर्षी राज्यात आंबा हंगामाची चांगली सुरूवात झाली आहे. शेतकरी चांगले पीक येण्याची आशा बाळगून आहेत. महाराष्ट्र कृषी पणन मंडळ म्हणजे एमएसएमबीने ५ हजार टन एवढा आंबा प्रक्रिया करून निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हापूस आणि केसर या दोन्ही लोकप्रिय जातींची सर्वाधिक निर्यात अपेक्षित आहे.कृषी पणन मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, हे फळ अमेरिका आणि युरोपसारख्या विकसित देशांमध्ये निर्यात करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना निर्यातीतून चांगला नफा मिळेल अशी अपेक्षा आहे. कर्नाटकमधील आंब्याला यावर्षी पाण्याचा तीव्र ताण बसत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंडळाने वाशी (मुंबई) येथील निर्यात सुविधा केंद्रामध्ये आवश्यक त्या सुविधा सज्ज ठेवल्या आहेत. विकिरण आणि बाष्प उष्णता या प्रणाली सुसज्ज आहेत. www.konkantoday.com