दापोली तालुक्यातील आसुदमधील हॉटेल व्यावसायिकाला सवलतीच्या दरात वस्तू देण्याचे आमिष, ७ लाख ३१ हजाराला गंडा

दापोली तालुक्यातील आसूद येथे राहणारे हॉटेल व्यावसायिक समर्थ जोशी यांना डिस्काऊंटमध्ये वस्तू मिळवून देतो, असे सांगून सुमारे ७ लाख ३१ हजार ८०१ रुपयांला गंडा घातल्याची घटना ३१ ऑक्टोबर २०२२ ते ३ मार्च २०२३ या कालावधीत घडली.दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थ जोशी वय २७ रा. आसूद, जोशी आळी यांनी लॅपटॉप, मोबाईल आयफोन, ऍक्टिवा व हुंडाई कंपनीचे क्रेटा कार अशा वस्तू डिस्काऊंट मध्ये मिळवून देतो असे एका महिलेने व किशोर गणेश कटके (दोन्ही रा. अक्कलकोट-सोलापूर) यांनी सांगितले. जोशी यांना सदर महिला व वरिष्ठ शासकीय अधिकारी असल्याचे सांगितल्याचे सांगितल्याने त्या महिला या वस्तू डिस्काऊंटमध्ये मिळवून देतील असा विश्‍वास वाटला. जोशी यांनी सदर महिलेला बँक अकाऊंटवर ७ लाख ३१ हजार ८०१ रुपये पाठविले. ते त्यांना प्राप्त देखील झाले. मात्र सदर महिलेने कोणत्याही वस्तू अगर गाडी दिली नाही. म्हणून जोशी यांनी वरील वस्तू व आडी आम्हाला कधी मिळेल असे विचारणा केली असता सदर महिलेने त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली. जोशी यांनी पैसे परत करा असे सांगितले असता त्यांनी पैसे देण्यास व वस्तू देण्यास टाळाटाळ करीत असल्याने जोशी यांनी फिर्याद दाखल केली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button