
जिल्ह्यात सतत बदलते वातावरण, लांजात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
रत्नागिरी शहरात आज दुपारी अचानक पावसाळी ढग जमा होवून पावसाळी वातावरण निर्माण झाले होते परंतु एमआयडीसी परिसरात काही प्रमाणात पाऊस शिंथडला. उर्वरित भागात मात्र पाऊस पडला नाही. तापमान वाढल्याने नागरिक त्रस्त झालेले असताना १८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अर्धा तास पडलेल्या जोरदार पावसामुळे उष्णतेने त्रस्त झालेल्या लांजामधील नागरिकांना काही अंशी का होईना उष्णतेपासून दिलासा मिळाला.गुरूवारी रात्री ११.३० वाजल्यापासून पाऊस येण्याची चाहूल लागली होती. त्यानंतर तासाभरातच विजांचा लखलखाट आणि कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरूवात झाली. या अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.www.konkantoday.com