चिपळूण नगर पालिकेच्या उक्ताडमधील वाहन तळाचा वापर वाहनाऐवजी कडधान्य वाळविण्यासाठी

चिपळूण नगर पालिकेचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. अनेक प्रकल्प वापराविना पडून आहेत. अशातच शहरातील उक्ताड येथील भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने असलेल्या वाहन तळाच्या ठिकाणी चक्क कडधान्ये वाळवली जात असल्याचे समोर आले आहे. माजी नगरसेवक, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक मोहनशेठ मिरगल यांनी याबाबत पोलखोल केली आहे. नव्याने आलेल्या मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.चिपळूण नगर पालिकेचे भाजी मंडई, मटण मार्केट, महिला क्रीडा संकुल असे कितीतरी प्रकल्प वापराविना पडून आहेत. करोडो रूपये खर्च करून शहरातील उक्ताड येथे वाहनतळ उभे करण्यात आले. मात्र तेही वापराविना आहे. मध्यंतरी अनधिकृतपणे या ठिकाणी वाहने लावली जात असल्याचे पुढे आले होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button