
स्वप्नाली सावंत खूनप्रकरण : पोलिसांना सापडला आणखी एक पुरावा
रत्नागिरी : पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या खून प्रकरणी पोलिसांच्या हाती आणखी एक पुरावा लागला आहे. यापूर्वी पोलिसांना खुनाच्या घटनास्थळावर स्वप्नालीची 7 ते 8 हाडे ा मिळाली होती. आता दात सापडला आहे. तो दात आता डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. स्वप्नाली सुकांत सावंत खूनप्रकरणी स्वप्नालीचा पती सुकांत गजानन सावंत, रूपेश ऊर्फ छोटा भाई सावंत व पम्या उर्फ प्रमोद गावणंग या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नालीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून या प्रकरणी पुराव्यांचा शोध घेतला. पोलिसांना मृतदेह जाळलेल्या ठिकाणी 6 ते 8 मानवी हाडे सापडली होती. तर बाजूलाच कुजलेल्या अवस्थेत मानवी मांसही मिळाले होते. यातील संशयितांना कठोर शिक्षा होण्यासाठी आणखी ठोस पुराव्यांची गरज असल्याने पोलिस त्या भागाची तपासणी करत होते. त्यावेळी घटनास्थळावर एक मानवी दात त्यांना सापडला आहे.