- मार्चअखेरीस थकीत करदात्यांकडील कराची रक्कम वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. पथकाने ६३.०६ टक्के वसुली केली आहे तसेच ५ थकित करदात्यांच्या मालमत्ता सील केल्या असून, १५ थकित करदात्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.प्रभारी मुख्याधिकारी चेतन विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाणीपट्टीची रक्कम वसूल करण्यासाठी थकित पाणीपट्टीधारकांच्या नळजोडण्या तोडण्याची मोहीम हाती घेतली होती. या कारवाईचा अनेक थकीत करदात्यांनी धसका घेत पाणीपट्टी भरणे पसंत केले. अजूनही १४ जणांनी पाणीपट्टी न भरल्यामुळे त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या पाठोपाठ घरपट्टी व मालमत्ताधारकांचीही कराची रक्कम वसूल करण्यासाठी वसुली पथकाने सुरवातीला डोअर टू डोअर जाऊन सूचना केल्या. त्यानंतर काही थकीत करदात्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यातील थकीत करदात्यांनी कराची रक्कम भरणा करत प्रशासनाला सहकार्य केले. उर्वरित १५ थकित करदात्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. www.konkantoday.com
Back to top button