कोकण रेल्वेच्या गाड्यांमध्ये ४ लाख ७३ हजार ९४८ प्रवासी चार्ट तयार झाल्यानंतर प्रतीक्षायादीत शिल्लक राहिले.

मध्यरेल्वेवरील मुंबई, पुणे आणि नागपूर स्थानकांवरून कोकण रेल्वेकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये १ एप्रिल, २०२३ ते १५ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत ४ लाख ७३ हजार ९४८ प्रवासी चार्ट तयार झाल्यानंतर प्रतीक्षायादीत राहिले.म्हणजे एवढ्या प्रवाशांना आरक्षण मिळू शकले नाही. त्याच कालावधीत २७ लाख ७६ हजार ६७७ प्रवाशांनी अनारक्षित (जनरल) तिकिटे काढली. एका दिवसाला सरासरी १ हजार ४९० प्रवासी प्रतीक्षायादीत राहिले तर ८ हजार ७३१ इतके प्रतिदिन सरासरी अनारक्षित प्रवासी होते. कोकण रेल्वेमार्गावरील मोठी प्रतीक्षा यादी असलेल्या गाड्यांमध्ये दादर-सावंतवाडी तुतारी, एलटीटी मडगाव एक्स्प्रेस, एलटीटी करमळी एक्स्प्रेस, मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेस, नागपूर मडगाव एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेस, एलटीटी-तिरूवअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस, एलटीटी मंगळुरू मत्स्यगंधा, एलटीटी-कोचुवेल्ली गरीब रथ, एलटीटी कोचुवेल्ली एक्स्प्रेस, दादर-तिरूनेलवेल्ली एक्स्प्रेस, एलटीटी-एर्नाकुलम एक्स्प्रेस, पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस, मुंबई- मंगळुरू एक्स्प्रेस, मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. एकूणच प्रतिदिन प्रतीक्षा यादी आणि अनारक्षित प्रवाशांची संख्या पाहता चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडीसाठी वाढीव गाड्यांची गरज अधोरेखित होते. तरी, रेल्वे प्रशासनाने आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, पुणे, नागपूर येथून वाढीव गाड्या कायमस्वरूपी सोडून या गर्दीवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्षजयवंत दरेकर यांनी रेल्वेकडे केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button