कोकणातील बदलत्या वातावरणामुळे आंबा पिकावर करपा पडण्याची शक्यता

कोकणात काही ठिकाणी पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे आर्द्रतेमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे आंब्यावरती करपा रोगाचे काळे डाग पण्याची शक्यता आहे. तसेच देठकूज या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने शिफारशीत केल्याप्रमाणे बुरशीनाशकाची फवारणी करणे उपयुक्त होईल. यासाठी ऍॉक्सिस्ट्रॉबिन २३.५ इं.सी. १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात बुरशीनाशकाची स्टिकर मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेमुळे वाढ झाल्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी हेक्टरी ४ नग रक्षक सापळे वेगवेगळ्या ठिकाणी झाडांच्या खालील बाजूच्या फांद्यांवर लावावेत. फळगळ झालेली आंबा फळे गोळा करून नष्ट करावीत आणि बागेत स्वच्छता ठेवावी. तयार झालेली आंबा फळे काढताना सकाळी १० पर्यंत व संध्याकाळी ४ नंतर नूतन झेलाच्या सहाल्याने काढणी करावी. काढणी पश्‍चात पुरशीजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी काढलेली फळे लगेचच ५० अंश सेल्सिअस पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत व नंतर सावलीत वाळवावीत. फळांची वाहतूक करताना रात्रीच्या वेळीस करावी. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button