कोंकणातील तापमानात वाढ झाल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर
नवी मुंबई :- कोंकण विभागातील तापमानात वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी अनावश्यक घराबाहेर पडू नये. आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन कोंकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते. उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे स्नायूंना आकडी येणे अशी लक्षणे दिसू लागताच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करावा.उष्माघात होऊ नये म्हणून तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात प्यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/ टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. कोंकणातील जनतेने काळजी घ्यावी . उन्हाळ्यात त्रास होऊ लागल्यास जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालय अथवा तालुका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. अनेक आरोग्य केंद्रात उष्णतेचा त्रास होणार्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची सोय करण्यात आली आहे. www.konkantoday.com