उन्हाळा स्पेशल मूगडाळ नाश्ता
सध्या उन्हाळा सुरू झाला आहे अशात आरोग्य जपत चांगला आहार घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी तुम्ही मुगडाळीचा नाश्ता करू शकता. मुगडाळ आणि साबुदाणापासून तुम्ही खूप पौष्टिक इडली बनवू शकता. उन्हाळ्यात सकाळी नाश्ताला हा पदार्थ आवर्जून करून पाहा. त्यासाठी ही सोपी रेसिपी नोट करा.
साहित्य
मुगडाळ, साबुदाणा, दही, बारीक चिरलेली मिरची, बारीक किसलेले आले, बारीक किसलेला गाजर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, तेल, मोहरी, जिरे, हिंग, मीठ, बेकींग सोडा, लिंबू.
कृती:- अर्धा कप मुगडाळ आणि एक चमचा साबुदाणा घ्या. मुगडाळ आणि साबुदाणा तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या.त्यानंतर शेवटी पाणी घालून मुगडाळ आणि साबुदाणा दोन ते तीन तास भिजू घाला. दोन ते तीन तासानंतर भिजवलेली डाळ आणि साबुदाणामध्ये दही घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. बारीत वाटून घेतलेले डाळ आणि साबुदाण्याचे मिश्रण चांगले फेटून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली मिरची, किसून घेतलेले आले, किसून घेतलेला गाजर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्यात एकत्रित करा. सर्व मिश्रण एकजीव करा. गॅसवर कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, कढपत्ता आणि हिंग घालून तडका तयार करा.त्यात चवीनुसार मीठ घाला.थोडा बेकींग सोडा टाका आणि लिंबाच रस टाका. हे सर्व मिश्रण एकत्र करा.त्यानंतर इडली पात्राला थोडं तेल लावा.त्यानंतर इडली पात्रामध्ये हे मिश्रण टाका.आठ ते दहा मिनिटानंतर या इडल्या टम्म फुगलेल्या दिसतील. पाच ते दहा मिनिटानंतर इडल्या थंड होऊ द्या आणि त्यानंतर चमच्याने या इडल्या काढून घ्याया इडल्या तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी किंवा दही बरोबर खाऊ शकता.मुगडाळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून उन्हाळ्यासाठी एक उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे.www.konkantoday.com