
आंजणारी काजळी नदीत मुळे शोधण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचाबुडून दुर्दैवी मृत्यू
लांजा तालुक्यातील आंजणारी नदीत मुळे शोधण्यासाठी नदीवर गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा खोल डोहात बुडून मृत्यू झाला आहे. मनीष नारायण शिंदे वय 21 व प्रमोद नारायण शिंदे वय 25 अशी दोघांची नावे आहेत. आज शनिवार दिनांक २० रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. आंजणारी काजळी नदीत मुळे शोधण्यासाठी हे दोघे गेले होते अशी माहिती मिळत आहे. खोल डोहाचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू ची घटना घडली आहे
www.konkantoday.com