सावंतवाडी-दिवा पॅसेंजरच्या धडकेने जखमी झालेल्या त्या तीन जखमी कामगारांना रूग्णालयातून डिस्चार्ज
कोकण रेल्वे मार्गावरील खेड-आंजणी विभागादरम्यानच्या अलसुरे बोगद्यानजिक सावंतवाडी-दिवा पॅसेंजरच्या धडकेने जखमी झालेल्या त्या तीन कामगारांना डिस्चार्ज देण्यात आला. तिघांवळ कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. सुनिता रमेश राठोड, रमेश भिमसेन राठोड, अरविंद रमेश जाधव या तिघांवर कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पॅसेंजरच्या धडकेने मृत्यू झालेल्या यशवंत तुकाराम राठोड या कामगाराच्या शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आला. दुर्घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या जमालाप्पा राठोड, अशोक फुलसिंग राठोड यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर रत्नागिरी येथील शसकीय रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान कोकण मार्गावरील खेड ते आंजणी रेल्वे स्थानकादरम्यानच्या अलसुरे बोगद्यानजिक बुधवारी रात्री उशिरापर्यंत रेल्वे प्रशासनाकडून गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीकडून त्या-त्या खात्याअंतर्गत सर्वांची चौकशी सुरूच होती. या चौकशीसाठी सर्व संबंधित यंत्रणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले हातेे. www.konkantoday.com