वैभव खेडेकर हा महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट नगराध्यक्ष-शिवसेना नेते रामदास कदम
. शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केला आहे. रामदास कदम यांनी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. वैभव खेडेकर हा महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट नगराध्यक्ष आहे.राज ठाकरेंचा फोन आला म्हणून मी शांत बसलो. अन्यथा अजून सात-आठ गुन्हे दाखल झाले असते, असा गौप्यस्फोटच रामदास कदम यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला. वैभव खेडेकर हा नावाला मनसेत आहे. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेचे अनिल परब, सदानंद कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम करतो. तो जर मला संपवायला निघाला तर मी सोडेन का?, असा इशाराच रामदास कदम यांनी वैभव खेडेकर यांना दिला.कोकणात शिवसेनेला जागा मिळेल अशी अपेक्षा होती, पण हरकत नाही याची कसर आम्ही विधानसभेत भरून काढू. सध्या दुधाची तहान ताकावर भागवतोय. नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्हा सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला नारायण राणे नाही तर नरेंद्र मोदी महत्त्वाचे आहेत. विधानसभेत शिवसेनेचा झंझावात दिसून येईल, असा दावा रामदास कदम यांनी केला. भाजपचे स्थानिक नेते माझ्यावर टीका करत आहेत. भाजपाने माझ्या विरोधात काम केले तर त्याचे परिणाम राज्यात दिसतील, असा इशाराही कदम यांनी दिला.www.konkantoday.com