लोकसभा निवडणूक – २०२४ शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांची ८ नामनिर्देशन पत्र दाखल -निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. १९ (जिमाका) – नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांनी ८ नामनिर्देशन पत्रे दाखल केली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
आज दाखल झालेली नामनिर्देशन पत्रे पुढीलप्रमाणे आहेत. सुरेश गोविंदराव शिंदे (सैनिक समाज पार्टी), विनायक लवु राऊत (अपक्ष), राजेंद्र लहू आयरे (बहुजन समाज पार्टी), मारुती रामचंद्र जोशी (वंचित बहुजन आघाडी), नारायण तातू राणे (भारतीय जनता पार्टी, २ नामनिर्देशन पत्रे दाखल), विनायक भाऊराव राऊत (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि अशोक गंगाराम पवार (बहुजन मुक्ती पार्टी) अशा ७ जणांनी ८ नामनिर्देशन पत्रे दाखल केली. आजअखेर ९ उमेदवारांची १३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. उद्या शनिवार २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. सोमवार २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.000