
लोकसभा निवडणुकीवर गावकर्यांनी बहिष्काराचा निर्णय मागे घेण्यासासठी प्रशासकीय यंत्रणा आज कळवंडेत
चिपळूण तालुक्यातील धरणाची तातडीने दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी कळवंडेसह कोंढे, पाचाड, रेहळ-भागाडीतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीवरील बहिष्कारासह चार गावात लोकप्रतिनिधींना बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून ग्रामस्थांची मनधरणी करण्यासाठी १८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता लघुपाटबंधारे विभागाच्या ठाणे येथील वरिष्ठांसह प्रांताधिकारी, तहसीलदार कळवंडे येथे बैठक घेणार आहेत. असे असले तरी धरण कामाचे लेखी आश्वासन देण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम असून सध्या बहिष्कार असल्याच्या निवेदनावर ४ हजार ग्रामस्थांच्या सह्या झाल्या आहेत.कळवंडे धरण लघु पाटबंधारे विभागासाठी आंदण असून आतापर्यंत गरज नसतानाही करोडो रुपयांची उधळण त्याच्या दुरूस्तीवर करण्यात आल्याचा आरोप ग्र्रामस्थ करीत आहेत. सध्या वरील चार गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून नद्यांमध्ये खडखडाट झाला आहे. विहिरींनी तळ गाठल्याने जनावरे सोडून देण्याची दुर्दैवी वेळ ग्रामस्थांवर आली आहे. www.konkantoday.com