
रत्नागिरी जिल्ह्यातील तीन तालुक्यात ९,८८२ ग्रामस्थांची तहान टँकरने भागवावी लागत आहे
दिवसागणिक तापमानाचा वाढत्या पार्याने जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्याची झळ चिपळूण, लांजा या तालुक्यांना बसली आहे. त्यानंतर आता खेड तालुक्यालाही बसू लागली आहे. जिल्ह्यातील एकूण १४ गावांतील २६ वाड्यांसह ९ हजार ८८२ ग्रामस्थांचा जीव या पाणीटंचाईने व्याकुळ होवू लागल्याचे चित्र आहे. या ग्रामस्थांना आतापर्यंत १२५ हून अधिक टँकरच्या फेर्यांद्वारे गेल्या आठवडाभरात पाणीपुरवठा करून तहान भागवण्यात आली आहे.www.konkantoday.com