रत्नागिरीतील महायुतीचे कॉर्पोरेट प्रचार कार्यालय आधुनिक सुविधांनी सज्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शेवटी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जहीर होण्याच्या आधीच राणे यांनी प्रत्येक तालुक्याचा दौरा करून आपला प्रचार सुरू केला होता. यावेळी महायुतीने प्रचार शिस्तबद्ध करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते याआधीच सक्रीय झाले होते. आता त्यांच्या जोडीला शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते येणार आहेत. या निवडणुकीसाठी रत्नागिरी शहरातील जेके फाईल्स येथे उभारण्यात आलेले महायुतीचे प्रचार कार्पोरेट सुसज्जतेचे भव्य कार्यालय सार्यांचे लक्ष वेधून घेत आहे.महायुतीचे भव्य प्रचार कार्यालय येथील निवडणुकीला समोर जाण्यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज ठेवण्यात आले आहे. या कार्यालयाचा नुकताच महायुतीतील भाजपा पक्षाचे नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उदघाटनही झाले. त्यानंतर या कार्यालयात महायुतीच्या प्रचारकार्याची सारी सूत्रे हलवली जात आहेत. निवडणुकीसाठी भव्य दिव्य असे हे प्रचार कार्यालय सज्ज झाले आहे. या कार्यालयाचे प्रवेशद्वार भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय अशा पक्षांच्या नेतेमंडळींच्या बॅनरबाजीने सजवले आहेत. तर पंतप्रधान मोंदींची कार्ययोजना व नेतेमंडळींच्या फ्लेक्सची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. अंतर्गत भागातही महायुतीतील राष्ट्रीय, राज्य ते अगदी स्थानिक स्तरावरच्या नेतेमंडळींच्या भव्य छायाचित्रांची सजावट करण्यात आली आहे. आतील सभा व्यासपीठ व त्यासमोर सुमारे २५० ते ३०० लोकांची आसन क्षमता अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रसारमाध्यमे व अतर्ंगत चर्चेससाठी भव्य कॉन्फरन्स रूम, २ वॉर रूम, ३६ पंख्यांची हवेशीर व्यवस्था, अंतर्गत भागात १८ मोठे एईडी हॅलोजन्सच्या प्रकाशाचा लखलखाट, सीसीटीव्ही कॅमेर्याच्या नजरेखाली हे प्रचार कार्यालय सज्ज ठेवण्यात आले आहे. www.konkantoday.com