
खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील वाटद व कोतवडे जिल्हा परिषद गटाचा मेळावा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व इंडिया आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील वाटद व कोतवडे जिल्हा परिषद गटाचा मेळावा विनायक राऊत यांच्या उपस्थितीत आज गणपतीपुळे येथील महालक्ष्मी हॉल येथे आयोजित केला होता.या वेळी विनायक राऊत यांनी संबोधित करताना यावेळचे मतदान वेगळे आणि महत्वाचे का आहे याचे महत्व पटवून देतानाच राज्य सरकारच्या निष्क्रियेतेवार तसेच केंद्र सरकारच्या दडपशाही वर सडकून टीका केली.या प्रसंगी उत्तर-पश्चिम मुंबईचे लोकसभेचे उमेदवार अमोलभैय्या कीर्तिकर, बंडयाशेठ साळवी, संजय पुनस्कर, कुमार शेट्ये, मिलिंद कीर, राजन सुर्वे, राजेंद्र महाडिक, प्रमोद शेरे, मंगेश साळवी, संजय साळवी, शेखर घोसाळे, सौ. वर्षा पितळे, सौ ममता जोशी, सौ. साक्षी रावनंग, आदी इंडिया आघाडीचे मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.www.konkantoday.com