१० टक्के वीजदर वाढीमुळे उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम, दापोलीतील उद्योजक आक्रमक
१ एप्रिलपासून महावितरणने वीज दरवाढ अंमलात आणली आहे. औद्योगिक ग्राहकांसाठी ही दरवाढ किसान १० टक्के असून या व्यतिरिक्त इंधन अधिभारही वाढणार आहे. तसेच स्थिर आकारात × १० टक्के वाढ झाली असल्याने ही दरवाढ मागे घेण्याबाबतचे निवेदन दापोली औद्योगिक क्षेत्र उद्योजक असोसिएशनने महावितरणला दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, औद्योगिक ग्राहकांसाठी महावितरणने १० टक्के दरवाढ झाल्याचे कागदोपत्री कळवले असले तरी प्रत्यक्षात ही दरवाढ सुमारे २० टक्के इतकी आहे. सध्या आर्थिक मंदीचा काळ असून बरेचसे उद्योग आर्थिक संकटात आहेत. जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात ७० टक्के उत्पादन कमी झाले आहे.राज्याच्या सीमेलगत कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश येथील वीज दर तुलनात्मक स्वस्त आहे. वीज दरवाढीचाा परिणाम पाण्याच्या दर वाढीवर होणार आहे. उद्योगांसाठी लागणारर्या कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे औद्योगिक उत्पादनांचे दर वाढणे अपरिहार्य असेल. नव्याने दर वाढवल्यास मागणी आणखी कमी होवून उद्योग बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. www.konkantoday.com