रायगड लोकसभा मतदारसंघात तीन अनंत गीते उमेदवार रिंगणात
नावात काय आहे, असे म्हणतात पण निवडणुकीच्या राजकारणात मतपत्रिकेवरील नावेच महत्वपूर्ण ठरतात. कारण चर्चेतल्या नावाचे भांडवल करून निवडणुका लढवल्या जातात. रायगडकरांना सध्या याचाच प्रत्यय येतो. अनंत गीते नावाचे तीन उमेदवार रायगड मतदार संघातून लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे करायचे आणि विरोधकांच्या मतांचे विभाजन करून त्यांची कोंडी करायची, अशी खेळी विरोधकांकडून खेळण्यात आली आहे.माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते पुन्हा एकदा रायगड लोकसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे ते उमेदवार असून इंडिया आघाडीने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी अनंत गीते, आणि अनंत बाळोजी गीते नामक दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.www.konkantoday.com