
मैत्रिणीबरोबर चॅटिंग करतो म्हणून वडिलांनी मुलाचा मोबाईल काढून घेतला, 14 वर्षाच्या मुलाची आत्महत्या
मैत्रिणीबरोबर चॅटिंग करतो म्हणून वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागामधून अल्पवयीन मुलाने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील सिलिंग फॅनच्या हुकला गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रकार रत्नागिरी शहरात घडला आहे ही घटना शुक्रवार 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वा.उघडकीस आली.
श्रीराज उर्फ हर्ष राजेंद्र पवार (14,रा.म्हाडा कॉलनी कोकणनगर,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.हर्ष त्याच्या शाळेतील मैत्रिणीसोबत फोनवर बोलत आणि इन्स्टाग्रामवर चाटिंग करायचा या कारणावरुन शुक्रवारी त्याच्या वडिलांनी त्याचा मोबाईल काढून घेतला.दुपारी 3 वा.ते कामावर निघून गेल्यानंतर हर्षने घराच्या वरच्या मजल्यावरी सिंलिंग फॅनच्या हुकला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.सायंकाळी 4.30 वा.त्याची आई वरच्या मजल्यावर गेली असता तिला हर्ष गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.दरम्यान,हर्षला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केेले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यानी त्याला तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com