त्या प्रकाराची कोकण रेल्वे महामंडळाने घेतली गंभीर दखल
रेल्वेच्या धडकेत कामगार मृत्यूप्रकरणी समितीकडून सखोल तपाससावंतवाडी-दिवा पॅसेंजरच्या धडकेत एक मृत कामगार आणि अन्य पाच जखमी कामगार दुर्घटनेच्या तपासासाठी कोकण रेल्वे प्रशाासनाने गठीत केलेल्या ९ अधिकार्यांची चौकशी समिती मंगळवारी सकाळी सुरू झाला आहे. समितीच्या अहवालात प्राप्तीनंतरच अपघाताच्याा नेमक्या कारणांचा उलगडा होणार आहे. दुर्घटनेतील मृत यशवंत तुकाराम राठोड याचे मंगळवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या दुर्घटनेच्या चौकशीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने चौकशी समिती गठीत केली असून ही समिती येथे दाखलही झाली आहे. या समितीत रेल्वेच्या सिग्नल विभागाचे अधिकारी, दूरसंचार विभागाचे अधिकारी, ऑपरेटींग विभाग, इंजिनिअर आदी विभागाती ९ अधिकार्यांचा समावेश आहे. या समितीमार्फत सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित ठेकेदारासह अन्य अधिकारी व कर्मचार्यांची सखोल चौकशी सुरू होती. या दुर्घटनेस नेमका जबाबदार कोण याचा उलगडा समितीच्या अहवाल प्राप्तीनंतरच होणार असल्याने सार्यांचे लक्ष अहवालाकडे लागले आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या यशवंत तुकाराम राठोड याच्या मृतदेहाचे रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते. मृत कामागाराचा मुलगा मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास विजापूर-कर्नाटक येथून कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाल्यानंतर मृतदेह मुलाच्या ताब्यात सोपविण्यात आला. येथील पोलिसांकडूनही दुर्घटनेची चौकशी सुरू अस्याचे समजते. www.konkantoday.com