कोकण मार्गावर आजपासून एलटीटी-थिविम स्पेशल
उन्हाळी सुट्टी हंगामामुळे कोकण मार्गावरून धावणार्या नियमित गाड्यांना होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेली लोकमान्य टिळक टर्मिनस-थिविम उन्हाळी स्पेशल १८ एप्रिलपासून धावणार आहे. ६ जूनपर्यंत स्पेशलच्या १६ फेर्या धावतील.०११८७/०११८८ क्रमांकाच्या एलटीटी-थिविम साप्ताहिक स्पेशलच्या १६ फेर्या धावणार आहेत. दर गुरूवारी धावणारी स्पेशल एलटीटीहून रात्रौ १०.१५ वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी ९.५० वाजताा थिविम येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात दर शुक्रवारी १९ एप्रिल ते १७ जूनपर्यंत धावणारी स्पेशल थिविम येथून सायंकाळी ४.३५ वाजता सुटून दुसर्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता एलटीटीला पोहचेल.२२ एलएचबी डब्यांची स्पेशल ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आदी स्थानकात थांबेल या स्पेशलमुळे रेल्वेगाड्यांना होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार असून चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.www.konkantoday.com