किल्ले रायगडावर रोपवे प्राधिकरणाने २३ एप्रिल पासून आपल्या नियमित ट्रॉलीमध्ये वाढ करण्याचा घेतला निर्णय
. किल्ले रायगडावर आबाल वृद्धांसाठी सुरू असलेल्या रोपवे प्राधिकरणाने २३ एप्रिल श्री हनुमान जयंती पासून आपल्या नियमित ट्रॉलीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तीन ऐवजी चार रोपवे ट्रॉली मधून प्रत्येकी सहा नुसार २४ शिवभक्तांचा प्रवास होणार आहे.ही सेवा श्री हनुमान जयंती पासून लोकार्पित होईल, अशी माहिती रोपवे प्राधिकरणाच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.रायगडावर जाण्यासाठी लहान मुले व अबाल वृद्धांना होणारा शारीरिक त्रास लक्षात घेऊन हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जाण्यासाठी केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने ३ एप्रिल १९९६ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक राजेंद्रसिंह यांच्या हस्ते रोपवे सेवा लोकार्पित करण्यात आला होता. या रोपवे अर्थात रज्जूरथ कार्यामध्ये आता एका ट्रॉलीची वाढ करण्यात आली असून आता एका वेळेला दोन्ही दिशेने चार ट्रॉली मधून २४ शिवभक्तांचा प्रवास होणार आहे.www.konkantoday.com