किरण सामंत राणेंचं काम करणार : उदय सामंत
नारायण राणे उमेदवार असले तरी किरण सामंत त्यांचं काम करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उदय सामंतांनी दिली आहे. किरण सामंत कधी ना कधी खासदार होतील,असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला. सामंत बंधूंनी सामंजास्याची भूमिका दाखवलीरत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी जवळपास नारायण राणेंचे नाव निश्चित होते. अखेर आज घोषणा झाली. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत देखील या जागेसाठी इच्छुक होते. रत्नागिरीत सध्या उदय सामंत आणि सिंधुदुर्गात नारायण राणे यांचे ताकत आहे. उदय सामंतांनी पत्रकार परिषदेत सामंत बंधूंनी सामंजास्याची भूमिका दाखवली आहे. नितेश राणे हे कणकवलीचे आमदार आहे. तर सावंतवाडीचे दिपक केसरकर आमदार आहेत. जे सध्या महायुतीमध्ये आहे. उद्या नारायण राणे अर्ज दाखल करणार आहे. किरण सामंत यांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आले असून अखेर नारायण राणे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नारायण राणेंसाठी 24 एप्रिलला अमित शहा यांची रत्नागिरीत जाहीर सभा आहे. भाजपकडून गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची जागाआहे. भाजपकडून गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची जागा सभेसाठी निश्चित करण्यात आली आहे.www.konkantoday.com