उष्णतेच्या लाटेने सिंधुदुर्ग होरपळून गेला
उष्णतेच्या लाटेने सिंधुदुर्ग जिल्हा आज अक्षरश: होरपळून गेला. उच्चांकी ३९ अंश तापमानाची नोंद झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. वाढलेल्या उष्म्यामुळे आंबा फळगळीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होण्यास सुरूवात झाली. सकाळपासूनच तापमान वाढीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. www.konkantoday.com