अपक्ष उमेदवार शकील सावंत साधत आहेत मतदारांशी थेट संवाद
अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी घरोघर जावून प्रचार करण्यावर भर दिला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. महाविकास आघाडी करून अनंत गीते यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तर महायुतीकडून उमेदवारी निश्चित झालेली नाही. कोकण स्वराज्य पक्षाकडून शकील सावंत हे या ठिकाणी निवडणूक लढवित आहेत. शकील सावंत यांनी पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एकीकडे महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नसताना अपक्ष शकील सावंत हे घरोघरी जावून प्रचार करण्यावर भर देत आहेत. निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच कोकण स्वराज्य पक्षाकडून त्यांची उमेदवारी पक्षाचे मुख्य संयोजक ऍड. ओवेच पेचकर यांनी जाहीर केले होते. निवडणूक जाहीर होताच शकील सावंत यांनी प्रचारात वेग घेतला आहे. जाहीर सभा न घेता सध्या घरोघरी जावून ते प्रचार करीत आहेत. एसटीतून मतदारांशी संवाद साधत आहेत. बाजारपेठेतील व्यापार्यांशी सर्वसामान्यांशी ते संवाद साधून प्रचार करीत आहेत. www.konkantoday.com