
नवोदीत सिने-नाट्य अभिनेता किशोर साळुंखे यांच्या अल्बम सॉंगने घातला धुमाकूळ
लांजा तालुक्यातील बापेरे-रावारी गावातील नवोदीत सिने-नाट्य अभिनेता म्हणून उदयाला येत असलेल्या किशोर साळुंखे यांनी ऐन शिमगोत्सवात आपा लांजा कोकणचा राजा या अल्बम सॉंगने लांजा तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. पालखी शिमगोत्सवाच्या कालावधीत या गीताचे बोल सर्वत्र ऐकू येत होते. चाकरमानी, स्थानिक ग्रामस्थांकडून अल्बम सॉंगसह किशोर साळुंखे यांचे कौतुक केले जात आहे.
हेरिटेज कल्चर आर्ट ऍण्ड एज्युकेशन डेव्हलपमेंट, सोसायटी संचलित जावडे हायस्कूलचा किशोर साळुंखे हा माजी विद्यार्थी आहे. अनेक एकांकिका, नाटक, यु ट्युबवरील वेबसिरीज, टीव्ही मालिकांमधून किशोर साळुंखे याने लहान मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. व्यावसायिक रंगभूमीवरदेखील त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून असंख्य रसिकांकडून दाद मिळवली आहे.
www.konkantoday.com
अभिनेता म्हणून उदयाला येत असलेल्या किशोर साळुंखे यांनी ऐन शिमगोत्सवात आपा लांजा कोकणचा राजा या अल्बम सॉंगने लांजा तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. पालखी शिमगोत्सवाच्या कालावधीत या गीताचे बोल सर्वत्र ऐकू येत होते. चाकरमानी, स्थानिक ग्रामस्थांकडून अल्बम सॉंगसह किशोर साळुंखे यांचे कौतुक केले जात आहे.हेरिटेज कल्चर आर्ट ऍण्ड एज्युकेशन डेव्हलपमेंट, सोसायटी संचलित जावडे हायस्कूलचा किशोर साळुंखे हा माजी विद्यार्थी आहे. अनेक एकांकिका, नाटक, यु ट्युबवरील वेबसिरीज, टीव्ही मालिकांमधून किशोर साळुंखे याने लहान मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. व्यावसायिक रंगभूमीवरदेखील त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून असंख्य रसिकांकडून दाद मिळवली आहे.www.konkantoday.com