
लांजा तालुक्यातील भांबेड बाजारपेठेत दुकानातील चोरीप्रकरणी एकजण ताब्यात
लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील भांबेड बाजारपेठेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. या चोर्यांच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांनी तालुक्यातील वाघणगाव येथून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील भांबेड बाजारपेठे येथील सिद्धीविनायक साायकल मार्ट टायर सर्व्हिस तसेच त्यांच्या बाजूच्या असलेल्या चंद्रकांत मांडववकर यांच्या मालकीचे शिवशंभू इलेक्ट्रीकल य दोन्ही दुकानात प्रवेश करून रोख रक्कम लंपाास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी संतोष सिताराम राऊत (४६, रा. बेनीखुर्द तेलीवाडी) यांनी याबाबत लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.www.konkantoday.com