रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीतील उमेदवार राणेंच्या मेळाव्यात सेना कार्यकर्त्यांची अनुपस्थिती

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीतील उमेदवारीवरून शिवसेना-भाजपमध्ये ताणाताणी सुरू असतानाच सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेने पाठ फिरवली. मित्रपक्ष राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित असतानाच शिवसेना पदाधिकार्‍यांनी मात्र आपली नाराजी अनुपस्थित रहात प्रकट केली.या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा महायुतीच्या उमेदवारांची अद्यापही घोषणा झालेली नाही. या मतदारसंघातून शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत तर भाजपकडून केंद्रीय मंत्री राणे यांची नावे पुढे आलेली असतानाच दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावरील आपला दावा कायम ठेवलेला आहे. उमेदवारीसाठी दोन्ही बाजूने रस्सीखेच सुरू असल्याने सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत कलह वाढीस लागला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button